वाचाळांचा शिमगा (अग्रलेख)

“मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला मुलगी पसंत असल्यास आपण तिला पळवून आणून लग्न लावून देऊ’, असे बेताल वक्‍तव्य कदम यांनी केले होते. कदम यांच्या विधानाची सीडी प्रदेश कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे. मुलींचा अपमान करणाऱ्या कदम यांच्या विधानाची भाजपने दखल घेतली आहे. त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. कदम यांनी नंतर खेद व्यक्त करत, “कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे म्हटले आहे. 
सत्ता आली की ती डोक्‍यात जाते. ज्यांनी इतरांपुढे आदर्श घालून द्यायचा, त्यांनीच बेताल वक्‍तव्ये केली, तर समाजाने काय आदर्श घ्यायचा? हिंदू संस्कृतीचा एकीकडे अभिमान बाळगायचा, महिलांना देवीचे स्थान द्यायचे; परंतु देव्हाऱ्यात बसवून नंतर मात्र तिची कायम अवहेलना करायची, असे संस्कृतीच्या विरोधात वर्तन करायचे, ही भाजपच्या नेत्यांची रीत आहे.
घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या समारंभात केलेले वक्‍तव्य आणि त्यांचा मुजोरपणा आता पक्षाच्या चांगलाच अंगलट आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जेव्हा कदम यांच्या वक्‍तव्याचा व्हिडीओ पोहोचला, तेव्हा त्यांनी त्यावर आवाज उठविला. सुरुवातीला कदम यांनी आपल्या वक्‍तव्यावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला; परंतु महिला वर्गातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने कदम यांनी दिलगिरी व्यक्‍त केली. “मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला मुलगी पसंत असल्यास आपण तिला पळवून आणून लग्न लावून देऊ, असे बेताल वक्‍तव्य कदम यांनी केले होते. कदम यांच्या विधानाची सीडी प्रदेश कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.
मुलींचा अपमान करणाऱ्या कदम यांच्या विधानाची भाजपने दखल घेतली आहे. त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. कदम यांनी नंतर खेद व्यक्‍त करत, “कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे म्हटले आहे. आव्हाड यांनी, “असे लोकप्रतिनिधी असल्यावर महिला कशा सुरक्षित राहणार’, असा प्रश्‍न केला. एका तरुणीने आता कदम यांना आव्हान दिले असून त्यात तिने, “कदम यांनी आपले अपहरण करून दाखवावेच’, असे म्हटले आहे. कदम यांच्यासह अन्य नेत्यांनीही अशीच वादग्रस्त वक्‍तव्ये केली आहेत. “कॉंग्रेसमध्ये प्रियांका गांधी यांच्यापेक्षाही अनेक सुंदर महिला नेत्या आणि अभिनेत्री असताना पक्षाने त्यांना स्टार प्रचारक म्हणून का नेमले’, असा प्रश्‍न विनय कटियार यांनी उपस्थित केला होता.
शरद यादव यांनी त्याअगोदर महिलांविषयी वादग्रस्त उद्‌गार काढले होते. राजकारणात महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदलतच नाही, हे यावरून स्पष्ट होते. कटियार हे भाजपचे खासदार असून ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. “बलात्काराच्या घटना रोखणे शक्‍य नाही. कारण कुणी काय सांगून बलात्कार करत नाही’, असे विधान मध्य प्रदेशचे मंत्री बाबूलाल गौर यांनी केले होते. “बलात्कार एकांतात केले जातात. कारण तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई केली जाते. तक्रार कधी खरी असते तर कधी खोटी असते’, असे ते म्हटले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपचे मध्य प्रदेशचे उद्योगमंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी महिला अत्याचारांसंदर्भात केलेल्या वक्‍तव्यांनी भाजपाची चांगलीच पंचाईत झाली होती.
“बलात्काराचे गुन्हे “भारता’मध्ये (ग्रामीण भारतात) नव्हे, तर पाश्‍चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या “इंडिया’मध्ये होतात’, असे भागवत म्हणाले होते. विजयवर्गीय यांनी त्यावर कडी करताना, “महिलांनी मर्यादा ओलांडल्यास त्यांना सीतेसारखे अग्निदिव्यातून जावेच लागणार’, असे वक्‍तव्य केले होते. भागवत यांच्या वक्‍तव्यावर माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी टीका केली होती. “महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढायला वाढते नागरीकरण व पाश्‍चिमात्य जीवनशैली कारणीभूत आहे. शहरी भारतात राहणाऱ्यांवर पाश्‍चिमात्य संस्कृती व जीवनशैलीचा प्रभाव आहे. महिलांवरील अत्याचार वाढायचे ते एक प्रमुख कारण आहे’, असे भागवत यांनी म्हटले होते.
“महिलांनी अत्याचार टाळण्यासाठी पारंपरिक कपडे परिधान करावेत’, असे विजयवर्गीय यांनी म्हटले होते. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला कोण जबाबदार, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. भाजपचे गुडगाव येथील नेते ओमप्रकाश धनखड यांनी, “हरियाणामध्ये भाजपची सत्ता आल्यास बिहारमधील तरुणींशी लग्न लावून देऊ,’ असे वादग्रस्त विधान केले होते. भाजपच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश धनखड हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात.
हरियाणात स्त्री-पुरुष यांचे सरासरी प्रमाण कमी असल्याने अनेक तरुण अविवाहित राहतात, यावर त्यांनी वरील तोडगा सुचवला होता. “मर्यादेचे उल्लाघन झाल्यास रावण येणारच,’ असे विधान कैलाश विजयवर्गीय यांनी केले होते. एकीकडे भाजपचे नेते वादग्रस्त विधाने करीत असताना दुसरीकडे आंध्र प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष के. शिवप्रसाद राव यांनीही एक आक्षेपार्ह वक्‍तव्य करून नवीन वाद ओढवून घेतला होता. “महिलांना कारसारखे घरात पार्क करून ठेवल्यास बलात्कार; तसेच छेडछाडीच्या घटना होणार नाहीत’, असे खळबळजनक वक्‍तव्य त्यांनी केले होते. महिलांकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित दृष्टी त्यातून दिसते.
“भारतात महिलांनी सार्वजनिक ठिकाणी एखाद्या नेत्याचे चुंबन घेतले, तर त्यावरून गदारोळ माजून त्या नेत्याची खुर्ची व निवडणुकीचे तिकीट या दोन्हींवर पाणी सोडावे लागेल’, असे बेताल विधान मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी केले होते. “रशियातील एका नेत्याच्या पत्नीने मला धोतर कसे घालतात, असा सवाल विचारला. त्यावर मी तिला धोतर कसे घालतात, यापेक्षा ते कसे सोडतो, हे दाखवू शकतो’, असे विधान त्यांनी करून भाजपचीही पंचाईत केली होती. समाजात महिलांना आपण काय स्थान देतो, हे त्यावरून कळायला हरकत नाही. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)