वाचन क्षमता शिक्षण प्रशिक्षणाचा समारोप

आकुर्डी – महाराष्ट्र विद्या प्राधिकरण व महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लोणी काळभोर, जिल्हा पुणे मार्फत समूह साधन केंद्र आकुर्डी येथे प्राथमिक शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचा समारोप समारंभ नुकताचा संपन्न झाला.

21 दिवस चाललेल्या शिक्षक प्रशिक्षणाचा एकूण 550 प्रशिक्षणार्थिंनी लाभ घेतला. शसम्शे तज्ज्ञ मार्गदर्शक शरद कर्णवर, अमोल नेहरे, श्रीकांत किर्तीकर, माधुरी खुटवड, मंगला पवार यांनी प्रशिक्षणार्थींना अप्रगत विद्यार्थी शाळेत टिकविण्यासाठी वेगवेगळे खेळ, समता, समानता, भाषा शिक्षण, वाचनाचे 10 टप्पे, पक्षांचा आवाज, संवाद, चित्रवर्णन, वाचन क्षमात विकसित करण्यासाठी घटनाक्रम व कृतीयुक्‍त प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपिठावर विक्रांत मोरे, बाळासाहेब जाधव, रामदास मेचे व इतर पाहुणे उपस्थित होते. बाळू महाजन, लीला पाटकर व मनीषा पिंगळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. संयोजक माळी रेवणनाथ, पद्‌मश्री परीट, उषा वाळके, भाऊसाहेब पगार, साहेबराव देवरे व शरद पटेल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती सी.के.गोयल विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळू महाजन व आभार सुनिता गवारे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)