वाचन एक अमृतानुभव

वाचन ही जगाच्या ज्ञानाकडे पाहण्याची खिडकी आहे. आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य वाचनातून मिळते. म्हणूनच “reading make a full man’s.” अमृत ज्याप्रमाणे जीवनरसाची भूमिका बजावते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील अमृतानुभव देण्याचे कार्य ग्रंथ पार पाडतात. म्हणूनच वाचन हा अमृतानुभव आहे. हे अमृत आपल्याला असेच मिळवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. उपयुक्त अशा ग्रंथसंपदेने तन व मन प्रसन्न करूया.

आज मागे वळून पाहताना आठवले की, तीन वर्षापूर्वी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व कमवा-शिका या योजनेमध्ये मी ग्रंथालयात काम करू लागलो व या अनोळखी कॉलेजमध्ये जणू काही पुस्तकांच्या रूपाने मला नकळत आपलेसे करणारा साथीदार मिळाला. खरेतर ग्रंथालयात काम करताना मला कधीच कंटाळा आला नाही. तर मला या पुस्तकांच्या सहवासात वेगळे आयुष्य अनुभवायला मिळाले. पुस्तकांची जुळवा-जुळव करत असताना माझ्या हातामध्ये अनेक प्रकारची पुस्तके येत होती. काही पुस्तकांचे मुखपृष्ठ इतके देखणे होते की, ते हातातून खाली ठेवायची इच्छा होत नसे. तर काही पुस्तकांच्या नावामध्ये इतकी ताकद होती की, मन म्हणत, चल आता वाचूनच टाक. तर काही पुस्तके हातात आल्यावर त्यातील छोटी अक्षरे व जुनी पाने पाहून कपाटात ठेवून कामाला लागत होतो.

या पुस्तकांच्या दुनियेमध्ये वावरत असताना मी अनेक प्रवासवर्णने वाचली. कादंबरी, लघुकथा, आत्मचरित्र वाचली. ही पुस्तके माझे मित्रच झाले होते. प्रवासवर्णन वाचताना मी नकळत माझ्या मनाच्या राज्यात अनेक गावे पाहून आलो. मनसोक्त भटकंती केली. उंच-उंच पर्वतांवर, आदिवासी भागांमध्ये, जिथे कोणीही जावू शकत नाही. अशा ठिकाणी मी पुस्तकांच्या सहवासात जाऊन आलो. “माझी मुलूखगिरी” या पुस्तकांमधून मिलिंद गुणाजी यांनी मला अनेक लेण्यांचे दर्शन घडवून आणणे. या पुस्तकांच्या सहवासात मी चक्क विदेशात भटकंती करू लागलो.

डॉ. सदाशिव शिवदे यांची ‘शिवपत्नी सईबाई’, रणजित देसाई यांचे पावनखिंड, वि.स.खांडेकर यांची ययाती, अनंत तिबिले यांची कुंती या पुस्तकांने मला भारताच्या अलौकिक इतिहासची ओळख करून दिली.

Everyone thinks to changing the world but no one thinks to changing himself असे आपल्या पुस्तकांतून सांगणाऱ्या लिओ टॉल्स्टॉय यांनी माझा जगाकडे व स्वता:कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

बाळकृष्ण कवटेकर यांच्या स्वांतत्र्यवीर सावरकर प्रदीप साळुंखे यांच्या वीर भगतसिंग, वनिता कामटे यांच्या टू द लास्ट बुलेट, फारूक नाईकवाडे यांच्या स्टील फेम या पुस्तकांनी माझ्यात देशभक्ती निर्माण केली व देशाच्या प्रति असणाऱ्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

विजया पाटील यांच्या सेकंद-सेकंद या पुस्तकाने मला प्रत्येक सेकांदाची किंमत करायला शिकवली. विलास मनोहर यांच्या नेगल या पुस्तकाने प्रकाश आमटे सारख्या व्यक्तिमत्वाची व प्राण्यांच्या दुनियेची नवी ओळख करून दिली. शिव खेरा यांच्या पुस्तकांने मला आत्मविश्वासाने जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जायला शिकवले. खरेतर ही पुस्तके वाचत असताना अनेक कथा कादंबरी वाचल्या. रा.का.खराडे यांची आभास व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही पुस्तके वाचताना मनाला नकळत चटका लागल्याची जाणीव होते.

खरचं या पुस्तकांच्या सहवासात वावरत असताना मला अनेक नविन अनुभव आले. प्रत्येक पुस्तक वाचताना फक्त मला शब्दांची रांग नजरेस पडत होती. तर मी जणू काही पुस्तकांची प्रत्येक गोष्ट जगत होतो. अनुभवत होतो. या माझ्या पुस्तक दोस्तांनी नि:स्वार्थपणाने मला खूप काही दिले. मला या स्पर्धेच्या युगात टाकायचे आहे याची जाणीव करून दिली. मला या निसर्गाचा मोकळा व प्रेमळ स्पर्श अनुभवायला शिकवला. एखादा विनोद वाचताना मनमुराद हसायला शिकवले व एखाद्याचे दु:खद आयुष्य वाचताना न कळत डोळ्यातून अश्रू आले. याच पुस्तकांच्या सहवासात मी स्वता: जाणून घ्यायला शिकलो व दुसऱ्याच्या भावना शब्दांविना जाणून कशा घ्यायच्या हेही पुस्तकांनेच शिकवले.

सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आपल्या एका लेखात म्हणतात, दूरदर्शन, इंटरनेट इत्यादी बाबी आल्यामुळे वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. खरे म्हणजे भारताच्या किती तरी आधी पाश्चात्य देशात या गोष्टी अस्तित्वात आलेल्या होत्या. म्हणजे तिकडे विज्ञान तंत्रज्ञानाच्या सुविधा वाढत आहेत आणि वाचकाची संख्याही वाढत आहे. हे जरा समजावून घेणे आवश्यक आहे. पुस्तक नावाची गोष्ट जोपर्यंत एकूण समाजाला अपरिहार्य आहे, असे वाटत नाही. तोपर्यंत समाज मागासलेला आहे, असे म्हणावे लागेल. एकंदरीत, समाजाच्या उन्नतीसाठी समाजाची सामूहिक सहनशक्ती वाढविण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय आपल्याजवळ नाही.

– प्रथमेश कुलकर्णी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)