वाचंदनगर शहराध्यक्षपदी वैशाली मिसाळ

वालचंदनगर- वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी वैशाली पोपट मिसाळ यांची नियुक्‍ती करण्यात आली. दरम्यान, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार भरणे यांच्या हस्ते मिसाळ यांना नियुक्‍ती पत्र देण्यात आले. महिला संघटना अधिक बळकट करताना महिलांचे प्रश्न कसोशीने सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन भरणे यांनी यावेळी केले. यावेळी महिला तालुकाध्यक्षा रेहना मुलाणी, वालचंदनगर शहराध्यक्ष तुषार घाडगे, कामगार नेते शिवाजी खटकाळे, आत्माराम लोंढे, राजेश जामदार, सचिन सपकळ, अंबादास शेळके, अरुण वीर, बाळासाहेब गायकवाड, सायमन वाघमारे, नवनाथ धांडोरे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)