वाघोली-मांजरी रस्ता आव्हाळवाडीत होणार बंद

वाघोली – आव्हाळवाडी गावामध्ये मुख्य रस्त्यावर ड्रेनेज पाइपलाईनचे काम करण्यात येणार असल्याने आव्हाळवाडी येथे वाघोली-मांजरी रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. यारस्त्यावरील वाहतूक केसनंद-कोलवडी मार्गे वळविण्यात यावी, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिले आहेत.

ड्रेनेज पाइपलाईन टाकण्याचे काम आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात येत आहे. आज, सायंकाळी पाइपलाईनचे काम सुरू करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे यांनी सांगितले.

वाघोली येथून मांजरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी केसनंद-कोलवडी मार्गे जावे, तसेच मांजरी येथून वाघोलीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनी कोलवडी-केसनंद मार्गाचा वापर करावा. हे काम अंदाजे चार ते पाच दिवस चालू शकते. वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)