वाघोली परिसरात गुंतवणूकदारांची पाठ

बदलत्या बाजारभावाचा फटका : भागातील बांधकामे रखडली
जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय मंदीत
वाघोली – हवेली तालुक्‍यातील वाघोली येथील परिसर गुंतवणुकीसाठी जंक्‍शन म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता याच परिसरामध्ये बांधकामे रखडल्याने जागा विक्रीचा व्यवसायाबरोबर इतर पूरक व्यवसायात मंदीची लाट पसरल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या परिसरात गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्याचे समजत आहे. एकेकाळी पुणे शहराचे उपनगर भाग म्हणून नावलौकिकास येणार आहे. या भागात गुंतवणुकीच्या बाबतीत ओस पडू लागला आहे.

वाघोली येथील केसनंद, लोणीकंद, वाडेबोल्हाई, शिरसवडी आदी भागात अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. अनेक नागरिकांनी या गृह प्रकल्पात आपली जमापुंजी गुंतवून घराचे स्वप्न पाहिले. आणि गृह प्रकल्प बांधून तयारही झाले. मात्र, नोटा बंदीच्या काळानंतर या गृहप्रकल्पामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची संख्या कमी झाली असून अनेक बांधकाम व्यावसायिकांना या बदलत्या बाजारभावाचा फटका बसला आहे.

-Ads-

अनेकांनी बॅंकेकडून कर्ज घेऊन घरांचे स्वप्न पूर्ण केले आहेत. मात्र, बॅंकेच्या हप्त्यापेक्षा घराचे भाडे स्वस्त असल्याने अनेकांनी गृहप्रकल्पातील गुंतवणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवाय अनेक सुविधांनीयुक्त अशा नामांकित सोसायट्यांमध्ये कमी पैशात राहता येत असल्याने गृहप्रकल्पातील गुंतवणूक कमी झाली आहे.
अनेक गृहप्रकल्पाचे बांधकाम अजूनही सोई सुविधांपासून दूरच असल्याचे आढळत आहे. वाघोली परिसरात अनेक गृहप्रकल्पात गुंतवणूक केलेल्या अनेक गृहप्रकल्पात अनेक लहान-मोठी कामे होणे अजूनही बाकी आहे. त्यामुळे असे वाद पोलीस ठाण्याच्या आवारात पोहचल्याने अनेक प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे लहान-मोठी कामे न झाल्याने नागरिकांत रोष ओढवल्याचे चित्र सद्यातरी पहावयास मिळत आहे.

 गुंठेवारी अडकली लाल फितीत
तुकडा बंदी कायद्याच्या जाचक अटी अजूनही जशाच्या तशा असल्याने 1 गुंठा जागा खरेदी करण्यासाठी करण्यात आलेल्या गुंतवणूक अजूनही सातबाऱ्यावरील नोंदीपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे गुंठेवारी व्यवसाय करणारे आणि एक, दोन, तीन गुंठे जागा खरेदी करणारे जाचक अटी आणि नियमात अडकले आहेत. 11 गुंठे जागा खरेदी करणारे सध्या तरी कमीच आहेत. त्यामुळे जागा घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अजून पूर्ण झालेच नाही.

 जागा खरेदीत फसवणूकही वाढली
एक गुंठा जागा खरेदी करून त्यांचे दस्त झाले आहेत. मात्र, सातबाऱ्यावर नोंद न झाल्याने काही ठिकाणी एक जागा अनेक जणांना विकली असल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे. त्यामुळे कमी किंमतीत जागा खरेदी करण्यात देखील फसवणुकीचा धोका वाढल्याने अनेकांनी या खरेदी-विक्री व्यवहाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 जागा वाटपाचे वाद न्यायालयात प्रलंबित
अनेक ठिकाणी सरस नीरस जागा आणि क्षेत्र वाटपाचे भावकीचे वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही काही ठिकाणी जागा विकल्या गेल्याने त्या जागा न्यायालयाच्या निर्णय प्रकियेत अडकल्या आहेत. त्यामुळे अशा जागा खरेदी करणाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

व्यावसायिकांनी व्यवसायातील विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर नागरिकांनी गुंतवणूक करताना गुंतवणुकीतील सुरक्षितता तपासण्यात यावी. तसेच गुंतवणुकीचा भविष्यात परतावा चांगला मिळेल. यासाठीचा विचार करण्यात यावा.
 गणेश कुटे, बांधकाम व्यवसायिक.

व्यवसायातील अनुभवाच्या आधारे जनहित जोपासणाऱ्या बांधकाम व्यासायिकांकडून तसेच जागा खरेदी-विक्री करणाऱ्या अनेक मंडळींनी हा व्यवसाय विश्वासाच्या बळावर उभा केला आहे. तोच विश्वास कायम ठेऊन व्यवसायात भरारी घेण्याबरोबरच जनहित जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
 नटराज सातव, बांधकाम व्यावसायिक.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)