वाघोली ग्रामपंचायतीने केली अपंग बांधवांची दिवाळी गोड

वाघोली- वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने 31 अपंग बांधवांना अपंग कल्याण निधीतून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. प्रहार संघटनेच्या वतीने दिवाळी निमित्त अपंग कल्यान निधीचे वाटप करावे अशी मागणी धर्मेन्द्र सातव यांनी केली होती. या मागणीची दखल सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच संदीप सातव, ग्राम विकास अधिकारी मधुकर दाते यांनी घेतली. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने आज (दि. 10) प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रत्येक अपंग बांधवांच्या बॅंक खात्यात जमा करून अंपग बांधवांची दिवाळी गोड केली आहे.
ज्या कारणासाठी निधी मागितले आहे, त्याच कारणावर अपंग बांधवांनी खर्च करावा, असे उपसरपंच संदीप सातव यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीप्रमाणे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती यांचाही अपंगासाठी असणाऱ्या अपंग कल्याण निधीचा लाभ लाभार्थीनी घ्यावा असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष धर्मेन्द्र सातव यांनी यावेळी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, शिवदास उबाळे, सामाजिक कार्यकर्ते कल्पेश जाचक,
बाजीराव पाचारणे, सुप्रिया लोखंडे, अनिता कांबळे आणि बहुसंख्येने अपंग बांधव उपस्थित होते.

केसनंदच्या 21 लाभार्थींना निधीचे वाटप

केसनंद येथील 21 लाभार्थींना 4 लाख रुपयांच्या अपंग कल्याण निधीचे वाटप करण्यात आले याशिवाय ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या पगाराएवढा बोनस, गणवेश, मिठाई वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी सातव यांनी दिली. यावेळी उपसरपंच रमेश हरगुडे, माजी उपसरपंच पांडुरंग हरगुडे, माजी उपसरपंच हिरामण हरगुडे, माजी उपसरपंच विकास गायकवाड, माजी सरपंच सुजाता कानिफनाथ सावंत, श्रीहरी बांगर, अलका हरगुडे, युवराज ढोरे, ग्रामविकास अधिकारी मिलिंद महाले, राजाराम सातव, तात्यासाहेब हरगुडे, भगवान सावंत, साहेबराव जगताप, अशोक भंडलकर, यशवंत जाधव, भाऊसाहेब बहिरट, काळूराम शितकल, शरद हरगुडे, तुषार वाव्हळ, भिमराव शिंदे, समीर हरगुडे, आदी मान्यवर उपस्थित होते .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)