वाघोली गाव प्लॅस्टिकमुक्त होणार

प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी ग्रामपंचायतीची जनजागृती
सरपंच वसुंधरा उबाळे यांची माहिती

वाघोली – महाराष्ट्र शासनाने दि. 23 रोजी लागू केलेल्या आदेशानुसार प्लॅस्टिक आणि थर्मोकोलपासून बनवलेल्या वस्तूंच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळावा, यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीच्या वतीने वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांना वाघोली गावाला प्लॅस्टिकमुक्त बनवूया, ह्या महितीपत्रकाद्वारे जनजागृती करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने दर शनिवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत नागरिक आणि पदाधिकारी यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून या उपक्रमात आज अखेरपर्यंत नागरिकांनी चांगला सहभाग नोंदविला आहे. थर्मोकोल प्लेट्‌स, प्लॅस्टिक कप, प्लॅस्टिक वेस्टन, प्लास्टिकच्या पिशव्या, नॉन वोवन पोली प्रॉपेलीन पिशव्या, प्लॅस्टिक बाऊल्स, चमचे आदींचा वापर टाळावा. तर कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, काचेच्या बरण्या, धातूचे डबे, किटल्या, पेले, सुपारीच्या पानाच्या तसेच उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या वस्तू, पत्रावळी यांचा वापर प्लॅस्टिकला पर्याय म्हणून करावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करून प्रबोधन करण्यात येत आहे. वाघोलीतील नागरिकांकडून या अभियानाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाच्या पत्रकाचे वाटप ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शिवदास उबाळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, संदीप कटके, सचिन उबाळे, व्यंकटेश राव, तात्या काळे, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .

वाघोली गावाला स्वच्छ, सुंदर आणि प्लॅस्टिकमुक्त बनवण्यासाठी नागरीकांनी प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळावा. तर प्लॅस्टिकला पर्याय असणाऱ्या वस्तूंचा वापर वाढवावा.
– संदीप कटके, नागरिक, वाघोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)