वाघोलीत सोसायटीमध्ये चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ

श्री स्वामी समर्थ सोसायटीत बंद फ्लॅट फोडला ; हत्यारबंद चोरटे

वाघोली- दोन महिन्यांपूर्वी वाघोलीतील सोसायट्यांमध्ये घातलेला धुमाकूळ शांत होत नाही. तोच वाघोली – केसनंद रोडच्या उंद्रे हॉस्पिटलजवळील श्री स्वामी समर्थ सोसायटीमध्ये चोरट्यांनी एक फ्लॅट फोडून धुमाकूळ घातला. हत्यारबंद चोरट्यांनी सोसायटीतील तीन कॅमेऱ्यांचे कनेक्‍शन तोडून बंद फ्लॅटमधील सामान अस्ताव्यस्त केले आहे. रविवारी (दि. 5) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एका चारचाकीतून चोरटे वाघोली – केसनंद रोडच्या उंद्रे हॉस्पिटलजवळील श्री स्वामी समर्थ सोसायटीमध्ये शिरले. त्यांच्याकडील हत्याराच्या सहाय्याने त्यांनी सोसायटीतील कॅमेऱ्यांचे कनेक्‍शन तोडले. यानंतर एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतील सामान अस्ताव्यस्त करून पसार झाले. यावेळी चोरट्यांच्या हाती काही ऐवज आणि रोकड लागली नाही. या घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण आहे. याबाबत सोसायटीधारकांनी लोणीकंद पोलिसांना खबर दिली आहे.

  • चोरीच्या सॅंट्रो कारचा वापर
    श्री स्वामी समर्थ सोसायटीमध्ये आलेल्या चोरट्यांनी सॅंट्रो कारचा वापर केला आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांच्या हालचाली व सॅंट्रो कार कैद झाली आहे. तरी तिचा नंबर दिसत नाही. त्याचदिवशी रात्री साई सत्यम (वाघोली) परिसरात एका घराचे कुलुपे तोडून जवळच असणारी सॅंट्रो कार (एम.एच. 12 बीजी 0275) चोरट्यांनी चोरली होती. कार चोरीला गेल्याची फिर्याद लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांनी वापरलेली सॅंट्रो कार व चोरीस गेलेली सॅंट्रो कार एकच असण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)