वाघोलीत सिग्नल यंत्रणा पूर्ववत होणार

वाघोली- पुणे-अहमदनगर महामार्गावर वाघोली (ता. हवेली) येथे सततची होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू असून, वाघोलीच्या वाघेश्वर मंदिर चौक, आव्हाळवाडी फाटा चौक, केसनंद फाटा चौक येथील सिग्नल यंत्रणा दुरुस्तीच्या कामाची सुरुवात तातडीने करण्यात येत असून लवकरच काही ठिकाणी बंद अवस्थेत असणारी सिग्नल यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यान्वित होऊन वाहतूक कोंडी कमी होणार आहे असल्याची माहिती ग्रामपंचायत वाघोलीचे सदस्य जयप्रकाश सातव यांनी दिली आहे. वाघोली (ता. हवेली) येथे सिग्नल यंत्रणेच्या वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या वाहतूक कोंडीत वाढ झाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत वाघोली आणि पोलीस प्रशासन यांच्या पुढाकाराने वाहतूक नियंत्रण करणाऱ्या सेवकांची नेमणूक ग्रामपंचायतीने केली असून, जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्धता करून लोणीकंद ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या प्रमुखांची लवकरच बैठक घेऊन वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश सातव यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)