वाघोलीत विहिरीतून काढल्या दोन दुचाकी

  • चोरीच्या असल्याची पोलीसांची प्राथमिक माहिती

वाघोली – वाघोली-लोहगाव रस्त्याकडेला असलेल्या विहिरीतून तीन दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. खूप महिन्यांपूर्वी या दुचाकी विहिरीत टाकण्यात आल्या असाव्यात यामुळे त्या पूर्णपणे खराब झाल्या असून दोन दुचाकींवर नगर जिल्हा पासिंगच्या नंबरप्लेट आहेत, यामुळे या दुचाकी चोरीच्या असल्याचे स्पष्ट होते.
याबाबतीत मिळालेली माहिती अशी की, वाघोली-लोहगाव रस्त्यालगत निसर्ग सोसायटीच्या अलीकडे सुदर्शन सोन्या सातव यांची विहीर आहे. सातव यांना तीन महिन्यांपूर्वी विहिरीमध्ये दोन दुचाकी असल्याचे दिसले होते. याबाबत त्यांनी लोणीकंद पोलिसांना कळविले देखील होते. त्यावेळी विहिरीचे पाणी खाली गेल्यानंतर दुचाकी बाहेर काढू, असे पोलिसांनी सांगितले होते. सद्यस्थितीत विहिरीचे पाणी तळापर्यंत पोहोचले असल्याने गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 19) गाळ काढण्याच्या यंत्राद्वारे विहिरीतील गाळात रुतलेल्या दोन स्प्लेंडर, एक पल्सर अशा दोन दुचाकी काढण्यात आल्या, त्याचबरोबर आणखी एका दुचाकीचा फक्त चासीचा सांगाडा मिळाला आहे. दुचाकी खूप दिवसांपूर्वी टाकण्यात आल्याने त्या पूर्णपणे खराब झाल्या आहेत. लोणीकंद पोलिसांनी दुचाकींची पाहणी करून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. सहा महिन्यांपूर्वी वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीतही दोन दुचाकी सापडल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)