वाघोलीत “वाघेश्वर’च्या तळ्याकाठी छटपूजेसाठी गर्दी

वाघोली- मावळत्या सूर्याला फळांचा नैवेद्य व अर्घ्य देत शेकडो उत्तर भारतीयांतर्फे मंगळवारी (दि.13) सायंकाळी छटपूजा वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या तळ्याकाठी उत्साहात साजरी करण्यात आली. “घरामध्ये सौख्य नांदू दे’, अशी प्रार्थना सूर्यदेवाला करीत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हजारो भाविकांनी तळ्याकाठी मोठी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे वाघोली येथील वाघेश्वर तळ्याकाठी वाघोली छटपूजा समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. चंदननगर, खराडी, लोहगाव परिसरातील अनेक भाविकांनी छटपूजेसाठी गर्दी केली होती. फटाक्‍यांची आतषबाजी देखील यावेळी करण्यात आली. भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. सुख समृद्ध, शांती घरात राहू दे अशी प्रार्थना करीत भाविक, महिलांनी पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य दिले तर फळाचा नैवेद्य ही सूर्यदेवाला अर्पण केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)