वाघोलीत महावितरण अडवणुकी पोलीस अधीक्षकांनी मागितला अहवाल

वाघोली- वाघोली येथील महावितरणच्या पूर्वरंग स्विचिंग उपकेंद्रापर्यंत 22 केव्ही उच्चदाब भूमिगत वाहिनीचे केबल टाकण्याच्या कामाला तुळापूर फाटा, लोणीकंद येथे अडथळा निर्माण करून भूमिगत वाहिनीच्या केबलचे नुकसान केल्याबाबत महावितरण आणि वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव यांनी केलेल्या पोलीस संरक्षणाच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ लोणीकंद पोलिसांकडे अहवाल मागविला आहे. गणपती उत्सवकाळामध्ये पोलीस बंदोबस्तात केबलचे काम केले जाण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी (दि. 11) संदीप सातव, संपत गाडे, जीवन जाधवराव, श्रीधर गाडे यांनी पाटील यांची भेट घेऊन संरक्षणाची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)