वाघोलीत प्लॅस्टिक बंदीची धडक कारवाई

वाघोली-येथील साई सत्यम पार्कमध्ये असलेल्या सन रे प्लास्टिक कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक आढळून आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टिक जप्त करून दंड आकाराला आहे. ही कारवाई दि. 11 ऑक्‍टोबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने संयुक्तरित्या केली आहे.
राज्य शासनाने प्लॅस्टिक वापरावर बंदी घालून सुद्धा प्लॅस्टिकचा वापर अद्यापही थांबलेला नाही. वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने दुकानदारांना प्लॅस्टिक आढळ्यास कारवाई करण्यात येईल, अशा अनेकवेळा लेखी नोटीसद्वारे कळवण्यात आले असतानाही प्लॅस्टिक वापर सुरूच आहे. त्यामुळे प्रदूषण महामंडळाकडून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाघोली येथील सन रे प्लॅस्टिक कारखान्याला सूचना देऊन देखील प्लॅस्टिक नष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांच्या वतीने प्रादेशिक अधिकारी डॉ. हेरंब प्रसाद गंधे, क्षेत्र अधिकारी समीर वस्त्रे, अरविंद धपाटे, रमाकांत सोरटे यांनी कारखान्यात मोठ्या प्रमाणावर असलेले प्लॅस्टिक जप्त करून 5 हजार रुपयाचा दंड आकाराला आहे. ही प्रथम कारवाई असल्यामुळे केवळ 5 हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. दुसरी कारवाई असेल तर 10 हजार रुपये आणि तिसरी कारवाई असेल तर 25 हजार दंड आणि सजा अशी तरतूद असल्याचे संबधित अधिकारी यांनी सांगितले. वाघोली आणि परिसरात कारवाईचे सत्र चालूच असणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. वाघोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेविकास अधिकारी मधुकर दाते, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या या कारवाईत भाग घेतला होता. या कारवाईमुळे बिधानस्त प्लॅस्टिक वापरणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

  • वाघोलीत 430 जणांना नोटीसा बजावल्या
    वाघोली ग्रामपंचायतीने हद्दीतील 430 किराणा माल, स्वीट होम, पान टपऱ्या,तसेच इतर लहान मोठ्या दुकानदारांना नोटीसा बजावल्या असून 430 पैकी एक जणांवर ही कारवाई झाली आहे. या पुढील काळात इतरांवर देखील कारवाई होणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)