वाघोलीत पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त

वाघोली- वाघोली (ता. हवेली) हद्दीतील बायफ रोड येथील गोडाऊनमध्ये गुटखा व पानमसाल्यांचा 10 लाख 81 हजार26 रूपयांचा माल लोणीकंद पोलिसांनी शनिवारी (दि. 18) जप्त केला असून गोडाऊन मालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संदीप चोरडीया या गोडाऊन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, वाघोली (ता. हवेली) हद्दीतील बायफ रोड येथील गोडाऊनमध्ये गुटखा व पानमसाल्यांचा अवैध साठा असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टकला त्यात विमल पान मसालाच्या 25 पोती, व्ही.वन. सुगंधीत तंबाखू 25 पोती, करमचंद पान मसाला एकूण 13 पोती, के. सी. जाफरानी जर्दा 7 मोठी पोती असा गुटखा, पान मसाला, तंबाखूचा साठा असा एकूण 10 लाख 81 हजार 26 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक होनमाने, कॉस्टेबल समीर पिलाणे यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी एस. एस. सावंत, वासुदेव पाबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास व अन्न औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी एस. एस. सावंत करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)