वाघोलीत नवीन कार्यकारिणीची उद्या ग्रामसभा

वाघोली- ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यकारीणीची सुरुवात 21 जानेवारीला झाल्यानंतर नवीन कार्यकारीणीची पहिली ग्रामसभा मंगळवारी (दि.30) ला होणार असल्याची माहीती ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी दिली.
नवनिर्वाचित सरपंच वससुंधरा उबाळे यांच्यासह सर्व सदस्यांच्या कार्यकारिणीची सुरुवात 21 जोनवारीपासून सुरू झाली असून, त्याच दिवशी उपसरपंच म्हणून रामकृष्ण सातव यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या कार्यकाळातील प-हिली ग्रामसभा मंगळवारी (दि. 30) आयोजित करण्यात आली आहे. ग्रामसभेचे आयोजन करण्यापूर्वी सात दिवस अगोदर अजेंडा प्रसिध्द करणे गरजेचे आहे आणि नवीन कार्यकारिणीची सुरुवात 21 जानेवारीला झाल्याने 26 जानेवारीची ग्रामसभा झाली नाही. ग्रामसभा होण्यापूर्वी एक दिवस अगोदर 29 जानेवारी रोजी महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. नवनिर्वाचित सरपंच उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ग्रामसभा होणार असल्याने ही ग्रामसभा गणसंख्येअभावी तहकूब होणार की पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)