वाघोलीत जुन्या भांडणातून तलवारीने वार

वाघोली- पूर्वीचा भांडणाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत तलवारीने वार झाल्याची घटना वाघोली येथील काळूबाई येथे शुक्रवारी (दि. 3) रात्री 12 च्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी खुनाचा प्रयत्न, मारहाणीचा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश मनोज गाडेकर, राजेश पवन गाडेकर, राजकुमार अंकुश गाडेकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, आर्म ऍक्‍टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर राजकुमार गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ज्ञानेश्वर अंकुश साळुंके यांच्यावर मारहाण, आर्म ऍक्‍टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)