वाघोलीत किल्ले बनवा स्पर्धा उत्साहात

वाघोली- गावातील बालचमूंसाठी जी.के.फाउंडेशन, श्री शिवछत्रपती प्रतिष्ठाण आणि अमोल सातव मित्र परिवार आयोजित द्वितीय वर्ष किल्ले बनवा स्पर्धेत 537 स्पर्धकांनी सहभाग घेतला. बालगोपाळांनी आपआपल्या किल्ल्यांना विविध नावे दिली होती. गावातील आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि वरीष्ठ मंडळींनी स्पर्धेची प्रशंसा करून निरीक्षकाचे काम केले. यावेळी दशरथ भाडळे, रामकृष्ण सातव, कविता दळवी, कल्पेश जाचक, संदिप कटके, ज्ञानेश्वर सातव, नवनाथ शिवरकर, विजय तांबे, सुधीर दळवी, चैतन्य मुजुमले, अमोल सातव आदी उपस्थित होते. म्‌ुद्रा प्रतिष्ठाण आणि अमोलदादा सातव मित्र परिवारा तर्फे स्पर्धकास सन्मान चिन्ह देण्यात आले. यामध्ये प्रमथ क्रमांक – तन्मय पुष्पा शिवाजी बोरडे, द्वितीय क्रमांक – संजना मालिनी संतोष काळे, तृतीय क्रमांक – हेमंत धनश्री धनंजय प्रभुणे, चौथवा क्रमांक – स्वराज वर्षा अनिल सातव, पाचवा क्रमांक – अथर्व अर्चना श्‍याम शिरसाठ याचा आला तर विशेष पारितोषिक आदित्य मनिषा सुनिल राजे, अभिषेक आश्विनी धनंजय रेणुससे, स्वरूप आरती संदिप कुसाळकर, वैभव नंदा, दयानंद पवार यांनी पटकावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)