वाघोलीतील सोसयट्यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य

वाघोली- वाघोलीच्या प्रश्नासंदर्भात वाघोली हौसिंग सोसायटीच्या सभासदांनी शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांना निवेदन देत चर्चेतून संवाद साधला. वाघोलीचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात पाचर्णे यांनी प्राधान्य देऊन मुख्यमंत्र्याशी चर्चा घडवून आणणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे असोसिएशनचे सदस्य संजीवकुमार पाटील यांनी सांगितले.
वाघोलीतील सोसायटींना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशन कार्यरत असून, या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली जात आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतल्यानंतर स्थानिक आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याशी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे उपस्थित होते. बैठकीदरम्यान पाचर्णे यांनी महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्याशी सपंर्क साधून महानगरपालिकेकडून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबत सांगितले. यावर आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
“पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांच्याशी चर्चा करून वाघोली पाणी प्रश्न आणि विकास आराखडा त्वरित मार्गी लावण्याबाबत विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे वाघोलीतील पुणे-नगर रस्त्याचे लवकरच रुंदीकरण करून वाहतूक कोंडी सोडविण्याचे आश्वासनही पाचर्णे यांनी दिले.
वाघोलीसाठी पाण्याचा अतिरिक्त कोटा वाढवून देण्यासंदर्भात पालकमंत्री आणि जलसंपदा विभागाशी चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्याचे निर्देश देऊन आमदार फंडातून घंटागाडी दिली जाणार, असल्याचे शिष्टमंडळास सांगितले. याबरोबरच वाघोलीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीचे नियोजन करण्याचे आश्वासन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)