वाघोलीतील प्रकल्पात कचरा वर्गीकरण सुरु

वाघोली- अनेक दिवसांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाघोलीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. महावितरणचे कनेक्‍शन मिळाल्यानंतर ठेकेदाराच्या वतीने उपलब्ध मशिनरीच्या मदतीने कचरा वर्गीकरण, खत बनविणे व इतर प्रक्रियांना सुरुवात बुधवारी (दि. 12) रोजी केली आहे. सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरु झाला नसला तरी कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले आहे. चोखी ढाणी येथे देखील दुसरा कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरु होणार असल्याने वाघोलीची कचरा समस्या सुटण्यास मदत होणार आहे, असे ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, संदीप सातव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)