वाघोलीतील पीएमारडीएच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील पिण्याच्या पाण्याची नवीन योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प केंद्राची उभारणी कामी सहकार्य व्हावे, नगर रोडचे चालू असलेले काम जलद गतीने व्हावे, तसेच कचरा उचलण्यासाठी गाड्या त्वरित देण्याची मागणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप सातव,ग्रामपंचायत सदस्य मारुती गाडे, सुधीर भाडळे यांनी पीएमआरडीए आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले की, वाघोली (ता. हवेली) या गावासाठी विशेष बाब म्हणून 23 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन देखील काम पाटबंधारे विभागाच्या परवानगी कामी रखडले असून, सध्या भीमा नदीतून होणारा पाण्याचा पुरवठा कमी जास्त प्रमाणात होऊ लागला आहे, त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची. मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय वाघोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनचे काम सध्या सुरू आहे, तर ग्रामपंचायतीने सांडपाणी शुद्धीकरण केंद्राकरिता जागा निश्‍चित केली आहे. सांडपाणी केंद्राच्या उभारणी कामी तातडीने निविदा काढण्यात याव्यात तर वाघोली (ता. हवेली) येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यांचे, चौकांचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे, हे काम संथ गतीने सुरू असून तातडीने करण्याची मागणी सातव यांनी केली आहे, याशिवाय पीएमआरडीएकडून ग्रामपंचायतीला कचरा उचलण्यासाठी देण्यात येणाऱ्या कचरागाड्या त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून, या मागणीचा विचार तातडीने करण्यात यावा अन्यथा वाघोलीत नव्याने झालेल्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सातव यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)