वाघोलीतील तीन चौकांतील वाहतूक प्रश्‍न सुटणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते 10 सप्टेंबर रोजी कामांचा शुभारंभ

माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांची माहिती

वाघोली – पुणे – नगर राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील श्री वाघेश्वर, आव्हाळवाडी व केसनंद या तीन संगम चौकांच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ सोमवारी (दि. 10) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे हस्ते होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली.

पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रयत्नातून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून 11 कोटी खर्चाच्या याकामाची सुरुवात होत असून रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात बावीस गाळे ते केसनंद फाटापर्यंतच्या कामाला सुरुवात केली जाईल. त्यानंतर वाघेश्वर मंदिर, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा चौक सुधारणा, रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढून रुंदीकरण, डीव्हायडरची उंची वाढविणे, वाघेश्वर चौकातून बाईफ रोडकडे विरुद्ध दिशेने होणाऱ्या रस्त्याची सुधारणा, श्रेयस मंगल कार्यालय ते केसनंद रोड पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा केली जाणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे राहणार असून खासदार शिवाजीराव आढळराव, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार संजय भेगडे, आमदार जगदीश मुळीक, पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सरपंच यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून यासाठी 11 कोटीची तरतूद करण्यात आली असल्याचे रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.

फोटो
आमदार बाबुराव पाचर्णे
रामभाऊ दाभाडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
24 :thumbsup:
3 :heart:
4 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)