वाघोलीतील कचरा प्रकल्प होणार सुरू

माजी सरपंच शिवदास उबाळे ः 16 टन कचऱ्याचे एकाचवेळी विघटन

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कचरा समस्या सोडवण्यासाठी 25 गुंठे जागेत कचरा प्रकल्प उभारण्यात शनिवार(दि. 24) पासून सुरुवात होणार असल्याची माहिती माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी दिली. वाघोली (ता. हवेली) येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने आज (दि. 20) कचरा प्रकल्पाची पाहणी करून कामाची माहिती घेतली. यावेळी माजी उपसरपंच संदीप सातव,ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, महेंद्र भाडळे, ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते आदी मान्यवर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. 64 टन कचऱ्याचे विघटन करण्याची क्षमता असणाऱ्या कचरा प्रकल्पात ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून कचऱ्यापासून इंधन आणि खत निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प चालक मनोहर दाभाडे, हेमंत धर्माधिकारी यांनी दिली. एकूण तीन संयत्र येथे बसवण्यात येणार असून, पैकी 16 टन कचऱ्याचे एकाच वेळी विघटन करण्याची क्षमता असणारे पहिले संयंत्र शनिवार (दि. 24) पासून सुरू होणार असल्याने नागरिकांची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
91 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
69 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)