वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव यांचा राजीनामा

File photo

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप सातव यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा सरपंच वसुंधरा उबाळे यांच्याकडे सुपूर्द केला असून, या राजीनाम्यामुळे वाघोलीत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे
वाघोली (ता. हवेली) येथील उपसरपंचपदाची सूत्रे संदीप सातव यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी हाती घेतली होती. त्यानंतर सातव यांनी कचरा प्रश्न, सांडपाणी प्रश्न, तसेच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी, तसेच सर्वसामान्य नागरिकांपासून ते गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्यांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कामगिरी केली होती. याबरोबरच पीएमआरडीएकडून वाघोलीच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी, तसेच तो निधी खर्चून काम त्वरित होण्यासाठी पाठपुरावा देखील केला होता. संदीप सातव यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी देखील त्यांची नुकतीच निवड झाली होती.
एकीकडे लोकाभिमुख कारकीर्द चालू असतानाच संदीप सातव यांनी अचानकपणे राजीनामा दिला आहे. सातव यांना राजीनामा द्यायला भाग पाडले की त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला, याबाबत चर्चा सुरू असून वाघोलीचे तत्कालीन उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील यांनी देखील असाच अचानकपणे राजीनामा दिला होता याचीच पुनरावृत्ती वाघोलीत पाहावयास मिळत आहे. याबाबत वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार राजीनामा दिला असून, पद असो अथवा नसो जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असणार असल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)