वाघोलीची तहकूब ग्रामसभा 4 डिसेंबरला होणार

वाघोली- वाघोली ग्रामपंचायतीची सोमवारी (दि.26) बोलाविण्यात आलेली ग्रामसभा गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली. ही तहकूब ग्रामसभा आता मंगळवारी (दि. 4) बोलाविण्यात आल्याची माहिती उपसरपंच संदीप सातव यांनी दिली. या ग्रामसभेमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे, विविध योजनेसाठी लाभार्थी निवड करणे, 2019-20 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे आणि आमचा गाव आमचा विकास आराखडा तयार करणे, सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाअंतर्गत 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या जागेबाबत चर्चा करणे, अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)