वाघोलीकरांना वीज बिलांचा “शॉक’

  • महावितरणच्या भोंगळ कारभाराने ग्राहक त्रस्त

वाघोली – येणारे अवाढव्य वीज बिल आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून महावितरण महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे वाघोली (ता. हवेली) परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महावितरण कडून वाढलेली वीज बिले कमी करण्यासाठी एक दिवसाच्या तक्रार निवारण केंद्राचे आयोजन करण्यात आले होते तरी सुद्धा ही समस्या अद्यापही “जैसे थे’च असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याशिवाय कोलवडी केसनंदच्या शिवेवर रामदास बापूसाहेब आव्हाळे, गुलाब बापूसाहेब आव्हाळे, मारुती बापूसाहेब आव्हाळे यांच्या मालकीच्या शेतातून वीज वाहक तार वारा व पाऊस यामुळे लोंबकळत असून शेती करताना आव्हाळे कुटूंबीयांना या वीज वाहक तारापासून जीविताला धोका निर्माण झाला असताना देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवून देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केली आहे. मात्र या विजवाहक तारांपासून जीविताला धोका वाढला असून याप्रकरणी महाविरणच्या अनागोंदी कारभाराबाबत पुणे विभागाच्या मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हवेली तालुक्‍याचे सरचिटणीस अजित आव्हाळे यांनी सांगितले.

वायरमन जाधव यांनी संबंधित जागेची पाहणी केली आहे, त्यामळे मी पाहणी केली नाही, पण तारा तातडीने ओढून नागरिकांची समस्या सोडवण्यात येणार आहे.
-नंदराम वैरागकर, सहाय्यक अभियंता, वाघोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)