वाघेश्‍वरी देवीच्या उत्सवानिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याने रंगत

पाटण : येथील वाघेश्‍वरी देवीच्या उत्सवानिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाड्यात पै. संदीप गायकवाड व पै. प्रवीण राजीवडे यांना गदा देताना मान्यवर.

कार्ला, (वार्ताहर) – पाटण मावळ येथील श्री वाघेश्‍वरी देवीच्या उत्सवानिमित्त कुस्ती शौकिनांसाठी कुस्त्यांच्या आखाडा घेण्यात आला होता. यामध्ये बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी आखाड्याच्या मैदानाने रंगत आणली.

एकूण 26 कुस्त्या व शेवटी दोन मानाच्या कुस्त्या घेण्यात आल्या. या शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी कै यशवंत बबन तिकोणे यांच्या स्मरणार्थ गणेश तिकोणे व संतोष तिकोणे 51,000 रुपये व कै. शिवाजी किसन तिकोणे यांच्या स्मरणार्थ विजय तिकोणे यांच्यातर्फे चांदीची गदा भेट देण्यात आली. या मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला वाघोलीचा पै संदिप गायकवाड, तर दुसऱ्या कुस्तीसाठी संदीप तिकोणे यांनी 31,000 रुपये, तर चांदीची गदा अक्षय तिकोणे यांच्या वतीने ठेवण्यात आली होती. आंबेगावचा प्रवीण राजीवडे हा मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला.

यामध्ये एक हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. कुस्तीचे पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन पंच पै. बंडू येवले व मावळ केसरी पै. खंडू कालेकर यांनी काम पाहिले. कुस्ती समालोचक म्हणून राहुल चौधरी व संदीप राजाराम तिकोणे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)