वाघेश्वर मंदिराची पर्यटन स्थळाकडे वाटचाल

वाघोली (ता. हवेली)- येथील वाघोली विकास प्रतिष्ठानने ग्रामस्थ, भक्तगण आणि लोकप्रतिनिधींच्या साह्याने वाघेश्वर मंदिर परिसराचा कायापालट करून दाखवला आहे. वाघोली विकास प्रतिष्ठानचे रामदास दाभाडे, बाळासाहेब जगताप, शिवदास उबाळे, पंढरीनाथ कटके, बाळासाहेब सातव, वसंत जाधवराव, सर्जेराव वाघमारे, दत्तात्रय कटके, राजेंद्र पायगुडे, सुनील कावडे, डॉ. स्मिता कोलते, वंदना थोरात, प्रियांका काळे आदी संचालक मंडळ आणि वाघेश्वर मंदिर यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. कै. नानासाहेब भगवंतराव सातव पाटील यांच्या स्मरणार्थ बापूसाहेब नानासाहेब सातव पाटील, वाल्मिक नानासाहेब सातव पाटील, राजेंद्र नानासाहेब सातव पाटील, आनंदराव नानासाहेब सातव पाटील यांच्याकडून 10 लाख रुपयांचे महाप्रवेशद्वार वाघेश्वर चरणी अर्पण करण्यात आले आहे. वाघेश्वर मंदिर परिसरात संपत गाडे यांच्याकडून 6 लाख रुपये किमतीची 21 फुट उंचीची घडीव दगडातील नवीन दीपमाळ अर्पण केल्याने ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास मोलाची मदत झाली आहे. याशिवाय वाघेश्वर स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी 24 लाख 61 हजार रुपये ग्रामनिधी ग्रामपंचायत वाघोली यांनी उपलब्ध केला, तर स्मशानभूमी आरसी शेड बांधकाम करण्यासाठी 5 लाख 97 हजार रुपयांचा निधीची तरतूद ग्रामपंचायत वाघोलीच्या वतीने करण्यात आली.स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून 6 लाख 83 हजार आणि वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने वाघेश्वर मंदिर सुधारणा करणेकामी 99 लाख 76 हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मंदिर परिसर निसर्गरम्य आणि आकर्षक होण्यासाठी या निधीची मोलाची मदत झाली आहे.
मंदिर परिसरात होत असलेल्या विकासकामांना नागरिकांकडून मोलाची साथ लाभली असल्यानेच नागरिकांनी देणगी दिली आहे, तसेच काहींनी सोने दान केले आहे. यामुळे सोन्यासारखी माणसे मंदिर परिसर विकासात हातभार लावत असल्याचा आनंद होत आहे, त्यामुळेच मंदिराला नवीन सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. या परिसरात भाविकभक्त, तसेच आबाल वृद्धांसाठी नाना-नानी पार्कची उभारणी करण्यात आली आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. माणसे कितीही मोठी झाली तरी त्यांची श्रद्धास्थाने त्यांच्या कायम स्मरणात राहतात. आज वाघोलीचा नावलौकिक वाढवणारी माणसे वाघोलीच्या, वाघेश्वरच्या मंदिर परिसर विकसित करण्यासाठी हातभार लावत आहेत, तेव्हा मनस्वी आनंद होतो आणि अभिमान वाटतो. धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटन स्थळ अशी वाघेश्‍वरची ओळख व्हावी, हीच येथील सर्वांची अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)