वाघुंडे खुर्दमध्ये भुयारी गटार कामास

सुपा – पारनेर तालुक्‍यातील वाघुंडे खुर्द येथे ग्रामपंचायत ग्रामनिधीतून भुयारी गटार कामास सरपंच संदीप मगर यांच्या हस्ते शनिवारी सुरुवात करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच डॉ. शत्रुघ्न मगर, शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा शिंदे, उपसरपंच राजश्री शिंदे, सुनीता मगर, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम कांडेकर, सागर मगर, भरत मगर, अजित मगर, नीलेश मगर, विठ्ठल नरसाळे, आकाश मगर, संतोष पवार, राहुल मगर, सचिन मगर, सद्दाम शेख, महादेव मगर, तुषार मगर उपस्थित होते. भुयारी गटार योजनेकरिता 7 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

वाघुंडे खुर्दचे सरपंच संदीप मगर म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये शंभर टक्के भुयारी गटारीकरण, सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे आश्‍वासन दिले होते. गावामध्ये लाईट, पाणी अशा सुविधा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)