वाघीरे महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 97.71 टक्के

ओतूर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी (दि.30) ऑनलाईन जाहिर करण्यात आला.यामध्ये ओतूर (ता.जुन्नर) येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि विज्ञान विभागाचा निकाल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य तानाजी साळवे यांनी जाहीर केला. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 97.71 टक्के लागला. यात प्रथम क्रमांक ऐश्वर्या संदीप पानसरे 89.54 टक्के, द्वितीय क्रमांक नेहा अनिल लेंडे 87.61 टक्के, तृतीय ऋतुजा संतोष शेरकर 84.92 टक्के. तर, वाणिज्य शाखेचा निकाल 96.42 टक्के तर, यात प्रथम क्रमांक धनश्री दत्तात्रय तांबे 85.08 टक्‍के, द्वितीय क्रमांक अल्फिया जावेद मोमीन 82.92 टक्‍के, तृतीय धनश्री बाबाजी डुंबरे 82.62 टक्के. याचबरोबर, कला शाखेचा निकाल 76.14 टक्के लागला. प्रथम क्रमांक श्रध्दा नंदकुमार मोढवे 82.95 टक्‍के, द्वितीय क्रमांक मयुर रासदास खंडागळे 79.54 टक्‍के, तृतीय आरती मधुकर भले 75.69 टक्के. व्यवसाय अभ्यासक्रम निकाल 91.76 टक्के लागला. यात प्रथम क्रमांक मयुरेश काशिनाथ काकडे 66.31 टक्‍के, द्वितीय क्रमांक पवन अर्जुन ढोबळे 64.62 टक्‍के, तृतीय क्रमांक रोहित सहदेव शिंगोटे 62.31 टक्के. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम तसेच अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे,उपप्राचार्य संजय बागडे, डॉ.जी.एम.डुंबरे, डॉ.एस.एफ.ढाकणे, शिक्षक व शिक्षकेत्तर, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)