वाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करू- देवेंद्र फडणवीस  

मुंबई: अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. ही हत्याच आहे, हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले, असा संताप केंद्रीय मंत्री मनेका गांधी व्यक्‍त करत अवनी वाघिणीची ही हत्याच असल्याचा आरोप त्यांनी केला. एकापाठोपाठ एक असे सलग ट्विट करत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला फैलावर घेतले आहे. वाघिणीवर गोळी झाडणाऱ्या नवाब शाफत अली खान याच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दुःखद घटना आहे. पण या वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यात का याची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री म्हणाले, वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दु:खद बाब आहे. मनेका गांधींचे प्राणीप्रेम आम्हाला माहित असून त्यांनी कठोर शब्दात केलेली टीका आम्ही समजू शकतो. वाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करुन या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का?, याचा तपास केला जाईल,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)