वाघाळे-वरुडे रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांचा धोका

रांजणगाव गणपती- वाघाळे-वरुडे रस्त्यावर वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे खांब वाकल्यामुळे विद्युतवाहक तारा लोंबकळत असल्याने याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे असे खांब त्वरीत दुरूस्त करावेत, अशी मागणी वाघाळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी ही बाब अनेकदा वीज वितरण कंपनींच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल न घेतल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाकडी टेकू लावला आहे. माञ, एखाद्या वादळ, वाऱ्यात हा टेकूही निसटून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता बळवत आहे. त्यामुळे हे खांब त्वरीत दुरुस्त करावेत, अशी मागणी वाघेश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने उपाध्यक्ष गणेश शेळके, अविनाश थोरात, संतोष शेळके, संपत शेळके यांनी केली आहे. वाघाळे-वरुडे रस्ता ओलांडून वाघाळे येथून वरुडेच्या दिशेने विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत वाहिनीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी खांब वाकले आहेत. परिमाणी तारा बऱ्याच ठिकाणी लोंबकळत असलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)