वाघाळा तलावातील गाळ काढण्यात प्रारंभ

रेडा- सराफवाडी गावाजवळ असलेल्या वाघाळ तलावातील गाळ काढण्यासाठी तीन पोकलॅन मशिनरी काम करीत असल्याने तलावात पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याची आशा आहे. बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे तीन पोकलॅन याठिकाणी पोहोचले आहेत, तसेच 30 ते 35 ट्रक्‍टर व 7 ते 8 डंपर याठिकाणी कार्यरत आहेत. सराफवाडी, दगडवाडी, रेडा, खोरोची रेडणी, निरवांगी येथील शेतकरी या तळ्यातून निघणारा गाळ आपल्या नापीक जमिनी पुन्हा पिकवण्यालायक करण्यासाठी भरुन घेत आहेत. दरम्यान, गाळ काढल्यामुळे या तलावातील पाणीसाठवण क्षमतेत वाढ होणार असल्याने परिसराला संजीवनी मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)