वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपूर – ब्रम्हपुरी तालुक्‍यात बोळधा येथील जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. शिरसागर गजानन ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या आठवडाभरापासून मानव व वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच आठवड्यात अस्वलाने व गुरूवारी बिबटयानेही लोकांवर हल्ला केला होता. त्यानंतर आज वाघाच्या हल्ल्याची ही घडली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)