वाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार

जगभरात वाघांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे. वाघांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या अभियानात आता अनुष्का शर्माही सहभागी झाली आहे. डिस्कव्हरीच्या माध्यमातून ती या जागतिक जनजागृती अभियानात सहभागी होणार आहे. “सीएटी : कन्झर्व्हिंग एकर्स फॉर टायगर्स’ या प्रोजेक्‍टच्या प्रमोशनसाठी ती काम करणार आहे. वाघांच्या अधिवासाला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी हा प्रोजेक्‍ट कार्यरत असणार आहे. या प्रोजेक्‍टसाठी डिस्कव्हरीने “वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड’बरोबर भागीदारी केली आहे.

अनुष्काने यापूर्वीही पशूसंवर्धनासाठी आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी काम केले आहे. त्यासाठी तिला 2017 साठी “पेटा पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले गेले होते. डिस्कव्हरीसाठीच्या व्हिडीओमध्ये तिने वाघांच्या अधिवासाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. “मार्जारकुळातील जगातील अतिशय सुंदर वाघांचे अधिवास धोक्‍यात आले आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. वाघ हे त्यांच्या प्रजातीतील सर्वात मोठे पशू आहेत. निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम ते करत असतात. हा समतोल बिघडला तर त्याचे परिणाम घातक होऊ शकतात. हे आपण सध्या अनुभवतो आहोत.’ असे अनुष्काने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

हे जग अधिक सुंदर करण्यासाठी आपण प्रत्येकानेच आपले योगदान द्यायला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण सुंदर जगाचा वारसा निर्माण करू शकलो पाहिजे. त्याचा अनुभव वाघांच्या संवर्धनातून मिळू शकतो, असे भावनिक आवाहन तिने केले आहे.

अनुष्काच्या “जब तक है जान’ला 6 वर्षे होऊन गेली. त्या रोमॅंटिक स्टोरीची आठवण अनुष्काने नुकतीच एका पोस्टद्वारे पुन्हा जागी केली. यश चोप्रा यांच्या अखेरच्या सिनेमात अनुष्का आणि शाहरुखला खूप कौतुक मिळाले होते. हा सिनेमा म्हणजे केवळ एक जादू होता. यशजींचे डायरेक्‍शन, ए. आर. रेहमानचे संगीत, शाहरुख आणि कतरिनाचा अप्रतिम अभिनय हे सगळे इथे जुळून आले होते. आता शाहरुख, कतरिना आणि अनुष्का हे त्रिकुट पुन्हा एकदा “झिरो’मधून एकत्र येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)