सोमेश्‍वरनगर- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत वाघळवाडी गावातील लाभधारक महिलांना गॅसचे वाटप गावच्या सरपंच नंदा सकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कुमार गॅस एजन्सीच्या माध्यमातून गॅस जोड देण्यात आले. कुमार गॅस एजन्सीचे प्रमुख अमित तापाडिया म्हणाले की, वाघळवाडी गाव धुर मुक्‍त करण्यासाठी आम्ही मदत करू ज्यांना अद्याप गॅस मिळाला नाही. त्यांना गॅस जोड मिळेल. यासाठी कागदपत्राची पुर्तता करुन घेऊन त्यांना गॅस मिळवून देऊ.गावातील एकही कुटंब गॅस जोड मिळण्यापासुन दुर रहाणार नाही असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतिश सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, अजिंक्‍य सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल लकडे यांनी केले. तर तुषार सकुंडे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)