वाघळवाडीतील ग्रामसभा पाच तास रंगली

  • विविध विषयांना मंजूर : कही प्रश्‍नांवर खडजंगी

सोमेश्‍वरनगर – वाघळवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा प्रलंबित 87 लाख रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेची कायदेशीर चौकशी, दारूबंदी, स्मशानभूमी, पाणंद रस्ते खुले करणे आदी विषयांवर ठराव मंजूर करीत सुमारे पाच तास चालली. काही विषयांवरील खडाजंगी वगळता सभा शांततेत पार पडली.
तत्पूर्वी सोमवारी (दि. 29) महिला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेला 100हून अधिक महिला उपस्थित राहून ग्रामसभा सुमारे दोन तास चालली. या महिला ग्रामसभेत महिलांनी पाणी, सांडपाणी व्यवस्था, रस्ते या गरजा पूर्ण करण्यासंबंधात चर्चा केली. तसेच गावातील महिलांसाठी आरोग्य शिबीर, अवैध दारू विक्री बंदी विरोधात ठराव घेण्यात आले. तर मंगळवारी (दि. 30) झालेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत सध्या असलेल्या स्मशानभूमीऐवजी नीरा डाव्या कालव्यालगत नवीन स्मशानभूमी व्हावी असा ठराव घेण्यात आला. तब्बल सात वर्षे होऊनही 87 लाख रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना सुरू झाली नसल्याने त्याची कायदेशीर चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला. अवैध दारूविक्री, बिअरबार बंद करण्यासंदर्भातही ठराव करण्यात आला. करवसुलीस सहकार्य न करणाऱ्यांस ग्रामपंचायतीने दाखले देऊ नयेत त्या संदर्भातील नोंद डिजीटल स्वरूपात करावी. बांधकाम झालेल्या घरांची मोजणी करून कर आकारण्यात यावेत, थकबाकी ठेवणाऱ्यास बांधकामासाठी पाणी देऊ नये, कन्नडवस्ती येथील विकासकामांना परवानगी द्यावी, सोमेश्‍वर कारखाना गाळप हंगामात व गावात सर्वाधिक जनावरे असतात त्यासाठी उपचारादाखल कायमस्वरूपी पशुवैद्यकीय दवाखाना द्यावा. घावात सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, गटार दुरूस्ती व व्यवस्था व्हावी, डीजेबंदी करावी, हायमास्ट टॉवरचे बांधकाम ग्रामस्थांनी जागेच्या प्रश्‍नावरून बंद केले होते ते जागा बदलून व नव्याने निविदा काढून बसवण्यात यावेत. 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाणी शुद्धीकरण यंत्र बसविणे, अंतर्गत रस्ते, रस्त्यावरील एलईडी दिवे बसविणे असेही उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी मागील सभेतील झालेली चर्चा व ठराव याची माहिती देण्यात आली.
महिला व सर्वसाधारण ग्रामसभा सरपंच नंदा सकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय लोणकर यांनी सभेचे कामकाज पाहिले. याप्रसंगी महसूल, आरोग्य, शिक्षण यांच्या प्रतिनिधींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)