वाखारीजवळ एकावर गोळीबार

यवत- दौंड तालुक्‍यातील वाखारी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्राजवळ मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकावर काठीने आणि धारदार हत्याराने तसेच लाथा बुक्‍यांनी मारहाण करून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी (दि. 29) रात्री 10.30च्या सुमारास घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात 16 ते 20 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.
ऋषिकेश बाळकृष्ण भोंडवे (वय 28, रा. रावेत, शिंदेवस्ती पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी भोंडवे आणि त्यांचे मित्र असे त्यांच्या इनोव्हा मोटारीतून येत असताना आरोपी यांनी स्कॉपिओ (एमएच 12 जेएन 297) ही पुणे- सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्‍यावर टोल देत नसल्याने भोंडवे यांनी खाली उतरून “टोल मी देतो’ असे म्हणाले. पुढे भोंडवे यांनी त्यांची मोटारगाडी न्यू अंबिका कला केंद्राजवळ थांबविली. या प्रकारचा राग मनात धरून अज्ञात मित्रांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने काठीने, धारदार हत्याराने तसेच लाथा- बुक्‍यांनी मारहाण करून गोळीबार करून भोंडवे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यवत पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्यानुसार यवत पोलीस तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)