वाकी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

वाकी-वाकी ते चाकण या रस्त्यावरील कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेल्या या भागात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. चाकण येथून पुढे वाकी गावाकडे जाताना सर्वप्रथम येथील आंबेठाण चौकातील उड्डाणपूला जवळ कचऱ्याचे मोठ मोठे ढीग साचले आहेत. तर प्लॅस्टिक बंदीनंतर कचरा कमी होईल, असे सर्वांनाच वाटत होते मात्र, अद्याप तसे काही झालेले दिसत नाही. येथील मार्केटयार्ड भागात कचरा नियमित उचलला जात नसल्याने नागरिक अनेक आजारांनी त्रस्त आहेत. चाकण व परिसरातील मोक्‍याच्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग उचलुन त्याची विल्हेवाट लावण्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चाकण व परिसरातील नागरिकांच्या मागणीला हरताळ फासले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)