वाकी-भाम येथे अर्भक आढळले

चाकण -अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक रस्त्याच्या कडेला सोडून दिल्याची घटना आज दुपारी चार वाजण्याचे सुमारास वाकी संतोष नगर भाम (ता. खेड) येथे उघडकीस आली. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील अजित मच्छिंद्र कड यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चाकणजवळील वाकी बुद्रुक संतोषनगर भाम येथे कोणीतरी अज्ञात महिलेने नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक कापडामध्ये गुंडाळून प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये घालून स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधावरील झुडपात उघड्यावर ठेवून दिले. ही घटना समजल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील कड यांनी चाकण पोलिसांत दिली असून चाकण पोलिसांनी अज्ञात महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)