वाकी खुर्द येथे दागिन्यांवर डल्ला

वाकी – भाड्याच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी दरवाजा उचकटून कपाटातील महागड्या दागिन्यांवर डल्ला मारला. हा प्रकार पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी येथील पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात आज (शनिवारी) जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सचिन दगडू शिंदे ( वय 34, रा. वाकी खुर्द, मूळ रा. पापळवाडी, वाडा रोड, चासकमान, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन शिंदे यांच्या घरातून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील एक तोळे वजनाचे कानातील वेल, एक तोळे वजनाचे तारेमधील गंठण, एक तोळे वजनाच्या वाट्यासह मनी असा एकूण 45 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला. शिंदे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार, विलास गोसावी व त्यांचे अन्य सहकारी पुढील तपास सुरू आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)