वाकी खुर्द झेडपी शाळेत चोरी

वाकी- वाकी खुर्द (ता. खेड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक कक्षाच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून खोलीत घुसून लोखंडी कपाटातील लॅपटॉपसह वायरलेस माईकसेट लांबविल्याचा प्रकार आज (गुरुवारी) उघडकीस आला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक वामन मोतीराम सूर्यवंशी (वय 50, रा. चाकण, ता. खेड, मूळ रा. पिंपळगाव, ता. साक्री, जि. धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. वाकी खुर्द गावच्या हद्दीत पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या प्राथमिक शाळेचे सूर्यवंशी हे गेल्या एक वर्षापासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहत आहेत. मंगळवारी (दि. 26) सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर सूर्यवंशी हे मुख्याध्यापक कक्षासह शाळेचे सर्व दरवाजे बंद करून घरी निघून गेले. बुधवारी (दि. 27) वटपौर्णिमा असल्याने शाळेला सुट्टी होती. याचाच फायदा घेवून चोरट्यांनी मुख्याध्यापक कक्षाच्या दरवाजाचे कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. व खोलीतील लोखंडी कपाटातील लॅपटॉप, कॉडलेस माईकचा सेट चोरून नेला आहे. या चोरीत शाळेचे 22 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)