वाकीत तिघांना मारहाणप्रकरणी सहाजणांना अटक

वाकी – पूर्ववैमनस्यातून 35 जणांच्या जमावाने रविवारी (दि. 24) वाकी बुद्रुक (ता. खेड) हद्दीतील समाधान खानावळ येथे तिघांना जबर मारहाण केली होती. याप्रकरणी चाकण पोलिसांनी खानावळ मालक, व्यवस्थापनासह काही वेटर अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे.

वाकी बुद्रुक येथे रविवारी ( दि. 24 जून ) रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी चाकण पोलिसांनी या खानावळचा मालक, व्यवस्थापक व काही वेटर अशा एकूण पसतीस जणांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. खानावळचा मालक मुकुंद मच्छिंद्र बोऱ्हाडे (वय 42), व्यवस्थापक अनिरुद्ध श्रावण जगताप (वय 38, दोघे रा. जऊळके खुर्द, ता. खेड), कोंडीभाऊ भिमाजी राक्षे (वय 46, रा. राक्षेवाडी, ता. खेड), बाबुराव ज्ञानेश्‍वर बोऱ्हाडे (वय 33), अब्दुल यासीम पठाण (वय 23), समाधान भगवान राऊत (वय 25, तिघे रा. जऊळके खुर्द, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर विकास शंकर चव्हाण, राहुल सुनील गायकवाड व बाळासाहेब टोपे यांना मारहाण करण्यात आली होती. तर विकास शंकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुकुंद बोराडे व त्याचा भाचा नामे राक्षे यांच्यासह खानावळ मधील वेटर अशा एकूण 35 जणांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, त्यापैकी चाकण पोलिसांनी सहा जणांना जेरबंद केले आहे. अन्य फरारींचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)