वाकीत अवकाळी पावसाचा शिडकावा

वाकी – दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आज (सोमवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. मात्र, पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी, शिरोली, भाम संतोषनगर, तसेच चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे, खालुंब्रे, खराबवाडी आदि भागात पावसाच्या जोरदार सरी आल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. मागील आठवड्यापासून या भागात उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, आज दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी हलकासा पाऊस पडला. मात्र, हा पाऊस रात्री वाढेल की, काय असा अंदाज बांधून नागरिकांनी शेतात ठेवलेला कांदा झाकून ठेवला. शिरोली परिसरातील वीटभट्ट्या चालकांनी विटा भिजू नये, याकरिता विटा झाकल्या. येथील मार्केटयार्डमध्ये उघड्यावर असलेला कांदा झाकण्यासाठी मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. ऐनवेळी झालेल्या पावसाने नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)