वाकांबे गावात भाटघर धरणग्रस्तांचे उपोषण

जोगवडी- भाटघर धरणग्रस्तांनी प्रलंबित प्रश्‍न तसेच विविध मागण्यांसाठी धरणालगतच्या वाकांबे गावामध्ये जानुबाई मंदिर आवारात उपोषण सुरु केले आहे.
सरकार विविध योजना राबविताना शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करते. या मोबदल्यात त्यांना किंवा त्यांच्या वारसांना सरकारी नोकऱ्या, पुनर्वसन जमिनी, प्रकल्पग्रस्त दाखले दिले जातात. परंतु, भाटघर धरणग्रस्तांना मात्र यापैकी कोणत्याच सुविधेचा लाभ मिळालेला नाही. 1924 मध्ये 5670 एकर जमीन भाटघर धरणाकरिता संपादित केली गेली त्यानंतर अद्यापही धरणग्रस्त सुविधांपासून वंचीत आहेत. याकडे लक्ष वेधण्याकरिता भाटघर धरण प्रकल्प पुनर्वसन समितीद्वारे उपोषण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अध्यक्ष भगवान कंक, वाकांबे गावातील ग्रामस्थ व इतर प्रकल्पग्रस्तांनी सहभाग घेतला आहे. राजगड पोलीसांनी उपोषणस्थळी बंदोबस्त ठेवला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)