वाकसई फाटा : येथे विकासकामांचे भुमिपूजन करताना मान्यवर.

कार्ला – वाकसई-देवघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने विविध भागातील सुमारे 50 लाखांहून अधिक रक्कमेच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आली. पंधरा दिवसापूर्वीच वाकसई-देवघर ग्रामपंचायतीचे नूतन सदस्यांनी सदस्य पदाचा भार स्वीकारला आहे.

विकासकामांमध्ये प्रामुख्याने वाकसई ते जेवरेवाडी रस्ता दुरुस्ती, वाकसई प्राथमिक शाळा दुरुस्ती, भिमनगर-वाकसई कॉंक्रिट रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, मुंबई-पुणे महामार्ग ते वैकुंठ स्मशानभुमी वाकसई कॉंक्रीट रस्ता, करंडोली-जेवरेवाडी अंगणवाडी दुरुस्ती व शौचालय, आदिवासी वस्ती करंडोली कॉंक्रीट रस्ता व आदिवासी वस्ती वाकसई येथे समाजमंदिर कामांचा समावेश आहे.

पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसूम काशिकर, पंचायत समिती सदस्य महादू उघडे, वाकसई गावचे सरपंच दीपक काशिकर, उपसरपंच मनोज जगताप यांच्या हस्ते या विकासकामांना सुरुवात करण्यात आली.

या वेळी मावळ पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक हुलावळे, मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संत तुकाराम झाड पादुका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भरत येवले, पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, उद्योजक बिनेश इनामदार, संतोष राऊत, नवनाथ देशमुख, अमोल केदारी, मारुती देशमुख, अशोक रोकडे, बाळासाहेब येवले, शंकर शिर्के, गणपत विकारी, प्रवीण येवले, वसंत विकारी, अनंता शिंदे, निवृत्ती देशमुख, अमोल शेलार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख, कैलास काशिकर, महेंद्र शिंदे, प्रदीप येवले, पुनम येवले, अनिता रोकडे, पुष्पा देसाई, आरती कारके, उषा देशमुख, निलम शेलार, ग्रामसेवक नवनाथ गर्जे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)