वाकळे आणि ढोणे आज स्वीकारणार पदभार

नगर: महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा पदभार अनुक्रमे बाबासाहेब वाकळे आणि मालन ढोणे उद्या (ता. 1) नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्वीकारणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता मिळवली आहे. महापौरपदी तर भाजपला पहिल्यादांच संधी मिळत आहे. त्यामुळे पदग्रहण सोहळ्याला कोण उपस्थित राहणार याची उत्सुकता लागली आहे.

बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेचे स्थायी समितीचे सभापतीपद संभाळले आहे. त्यामुळे त्यांना कारभाराचा अनुभव आहे. वाकळे हे कारभार कसा करतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. मालन ढोणे या भाजपच्या त्या कट्टर कार्यकर्त्या आहेत. वाकळे आणि ढोणे यांच्या रुपाने आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजप महापालिकेच्या माध्यमातून शहर विकासाचा गाडा कसा चालवितात, याकडे सत्ताधारी नगरसेवक, सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांसह, विरोधकांचे लक्ष राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेष करून, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शहर विकासासाठी 300 कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील महापौर व उपमहापौर भाजपला मिळाल्याबरोबरच नगरमध्ये येऊन दोन आठवड्यात शंभर कोटी देऊ, असे जाहीर केले होते. वाकळे आणि ढोणे या निधीसाठी प्रदेशपातळीवर कसा पाठपुरावा करतात याकडे लक्ष राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)