वाकणवाडी जिल्हा परिषद शाळेचे सुशोभिकरण 

खेड – कर्जत तालुक्‍यातील वाकणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचेसुशोभिकरण करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, सरपंच वर्षातापकीर, उपसरपंच लक्ष्मी तापकीर, माजी सरपंच प्रणिती तापकीर यांनी शाळेच्या सुशोभिकरणासाठी पाठपुरावा केला. काकासाहेब तापकीर यांच्या हस्तेसुभोभिकरणाचे उद्‌घाटन झाले. बलभीम पठारे, विष्णू तापकीर, राजेंद्र तापकीर, सुनील तापकीर, प्रकाश पठारे, ज्ञानदेव भालसिंग, अभिजीत तापकीर, वैभव तापकीर, शुभम पठारे, अमृत पठारे, चंद्रकांत तापकीर, कुशाबा वायसे, शहाजी पठारे, सतीश भालसिंग, सुरेश पठारे, कुंडलिक पठारे, प्रशांत तापकीर, विठ्ठल तापकीर, अमोल गांगर्डेउपस्थित होते. शाळेचेआकर्षक रंगकाम , चित्र काढलेल्या भिंती , शाळासमोरील पेव्हिंग ब्लॉक यामुळेशाळेच्या आकर्षकतेत भर पडली आहे. शुध्द पिण्याच्या पाण्याची सोयही शाळेत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)