वाकड येथे सव्वा सहा किलो गांजा जप्त

पिंपरी – वाकड येथे भूमकर चौकाजवळ एका इसमाकडून सहा किलो 273 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

अभयकुमार देबेंद्रनाथ परिडा (वय-38, रा. कालाखडक झोपडपट्टी, वाकड. मूळ रा. सारना, ता. बालीकुडा, जि. जगतसिंगपूर, ओरिसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

-Ads-

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी भूमकर चौकाजवळ असलेल्या एच. पी. पेट्रोल पंपासमोर एक इसम संशयितरित्या थांबला असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांना मिळाली. त्यानुसार पेट्रोल पंपासमोर जाऊन अभयकुमार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या पांढ-या पोत्यात 92 हजार 500 रुपये किमतीचा 6 किलो 273 ग्रॅम गांजा मिळून आला. यावरून त्याला अटक करण्यात आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक मुळे, महाले, पोलीस कर्मचारी प्रदीप शेलार, राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, बाळासाहेब सूर्यवंशी, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, शैलेश मगर, अशोक गारगोट, रमेश भिसे, बाळासाहेब दौंडकर, तुकाराम घुगे, दादा धस यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)