वाकड येथे वाहतूक पोलिसाला मारहाण

पिंपरी – हिंजवडी व वाकड येथे वहातूक पोलिसांना कर्त्यव्यावर असताना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांची एक मालिकाच मागील महिनाभरापासून सुरु झाली आहे. त्यात बुधवारी एका घडनेची भर पडली असून, रात्री पावणे आठच्या सुमारास कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण झाली आहे.

याप्रकरणी कुंदन गजानन तोत्रे (वय-31 रा. शिवाजीनगर पोलीस वहाहत) यांनी बापू डांगे, कारचालक सुरज मोतीलालपरमार व शवरोलेट ऑक्‍ट्रा कार (क्रमांक एमएच 14 एव्ही 2020) यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तोत्रे हे डांगे चौक येथे कर्तव्याचे पालन करत असताना सुरज याने नियमांचे पालन न करता भऱधाव वेगाने गाडी चालवली. यावेळी भरचौकात कार गोलाकार फिरवून स्टंट करत असताना समोरील दोन कारला धडक बसली. यावेळी त्यांना जाब विचारण्यासाठी तोत्रे गेले असता त्यांनाच आरोपींनी धक्काबुक्की केली व शिबीगाळ केली.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे सरकारी कर्मच्याऱ्यास मारहाण करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.या आधिही स्थानीक गुठेंदार, राजकीय प्रतिनिधीचे नातेवाईक यांनी हिंजवडी व वाकड परिसरात वाहतूक पोलिसांना मारहाण व शिवीगाळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यावर पोलीस यंत्रणांनी वेळीच चाप बसवणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)